महाराष्ट्रातून १०७ पाकिस्तानी नागरीक झाले गायब

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता भारत सरकारने कठोर भूमिका घेत पाक विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यांतून पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना पाकमध्ये परत धाडण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारनं शोध मोही हाती घेतली. यातून समोर आलेली आकडेवारी अतिशय गंभीर आहे. राज्यातील ४८ शहरांमध्ये ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. तर फक्त ५१ जणांकडे वैध कागदपत्र आहेत. १०७ पाकीस्तानी नागरिकांचा कोणाताही ठावठिकाणा सरकारला सापडत नाहीये.
- सर्वांधिक २ हजार ४५८ पाकिस्तानी नागपूरमध्ये वास्तव्यास आहेत.
- १ हजार १०६ पाकिस्तानी नागरिक ठाण्यात आहेत.