रायगड जिल्ह्यात 103 गावं दरड प्रवणक्षेत्रात …

 रायगड जिल्ह्यात 103 गावं दरड प्रवणक्षेत्रात …

अलिबाग, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रायगड जिल्ह्यातील एकूण १०३ गावे धोकादायक क्षेत्रामध्ये असून यामध्ये ९ गावे अतिधोकादायक तर ११ गावे धोकादायक मध्ये आहेत तर ८३ गावे अल्पधोकादायक क्षेत्रामध्ये मोडतात.

त्यामुळे येथील नागरीकांचे स्थलांतर जिल्हा प्रशासनाने सुरु केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. इरशाळवाडी येथे दरड कोसल्याच्या घटनेनंतर, जिल्हाधिकारी म्हसे यांनी आपल्या सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व दरडप्रवण क्षेत्राचा आढावा घेतला.
 
जिल्ह्यात सर्वाधिक महाडमध्ये ४९ गावं दरडप्रवण क्षेत्रात आहेत. यात १ अतिधोकादायक आणि ६ गावं धोकादायक क्षेत्रात आहेत. पोलादपूरमध्ये १५ गावं दरडप्रवण क्षेत्रात आहेत. यात २ गावं धोकादायक क्षेत्रात आहेत.

रोहा तालुक्यात १३ गावं दरडप्रवण क्षेत्रात आहेत. २ धोकादायक क्षेत्रात मोडतात. म्हसळ्याला ६ गावं, माणगावमध्ये ५, पनवेल ३, खालापूर, कर्जत या दोन्ही तालुक्यांत प्रत्येक तीन गावं दरडप्रवण क्षेत्रात आहेत आणि या दोन्ही ठिकाणी एक, एक गाव अति धोकादायक क्षेत्रात आहे. 103 villages in Raigad district are in flood prone area.
 
तसेच सुधागड ३, श्रीवर्धन २, तळा तालुक्यात १ गाव दरडप्रवण क्षेत्रात आहेत. अलिबाग, पेण, मुरुड आणि उरण तालुक्यात एकही गाव असुरक्षित स्थळी नाही. एकंदरीत, जिल्ह्यात १०३ गावं दरड प्रवणक्षेत्रात आहेत. २० धोकादायक गावे असून ९ गावे अतिधोकादायक आहेत. २० गावातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. उर्वरित 83 गावांची पाहणी सुरु आहे. यातील प्रत्येक गावाची जबाबदारी एका वरिष्ठ अधिकार्‍याकडे सोपवण्यात आली असल्याचे डॉ. म्हसे यांनी सांगितले.
 
ही दरड प्रवण गावे आहेत.. धोकादायक :-

  1. म्हसळा :-
    वावा (शेख मोहल्ला)
    आमशेत
    खारेगाव (सक्लाप)
    लिप्रि
    देवघर

मारीयम खार (खारगाव)

  1. महाड :-
    तुडील (छोटे)
    तोल खुर्द (बुद्धवाडी)
    मोरेवाडी (शिंगरकोंड)
    पातेरेवाडी (अंबिवली बुद्रुक)
    कोंडीवते
    मुथावली
    सोंघर
    चांधवे खुर्द
    साव
    रोहन
    जंगमवाडी (कोथेरी)
    माझेरी
    कोसबी
    दासगाव (भोईवाडा)
    पुनडे
    पाचडवाडी
    मुर्मुशी (बुद्धवाडी)
    पर्माची
    चिंभवे (बुद्धवाडी)
    चोचिंधे
    गोठे बुद्रुक
    काळभैरव नगर (नांदगाव)
    अदिसे
    खैरे
    वालण बुद्रुक
    रावटाले (मानेची धार)
    मोहोट
    वराथी (बुद्धवाडी)
    कुर्ले दांडवली
    जुई (बु)
    नानेमाची/ नानावाडी (वाकी बुद्रुक)
    मांडले
    वामने
    टोल बुद्रुक
    कोंडीवते (नवीन)
    पिंपळ कोंड
    वाळंग
    शेलटोळी
    मुरुरही (गावठाण)
    कुंबाले
    चोचिंधे (कोंड)
    विर
    आंब्याचा कोंड (मुर्मुशी)
    तळोशी
    वेरखोले (बिरवाडी)
    करंजखोल
    हेटकरकोंड (संदोशी)

मराठवाडी (विर)

  1. खालापूर :-
    सुभाषनगर
    नारंगी (दुत्तावाडी)

तोंडली

  1. कर्जत :-
    मुद्रे (बुद्रुक)
    आंबरवाडी (आल्याची वाडी)
    सांगवी
    —————————————– 
  2. श्रीवर्धन :-
    बागमंडला

मेटकर्णी

  1. पोलादपुर :-
    कोंधवली (मराठवाडी)
    कोतवली खुर्द
    तुतवली
    चराई (सोनारवाडी आणि भोईवाडी)
    सवाड
    येलंगवाडी (भोनंग)
    ओंबाली
    सडवली (शिवाजी नगर)
    केवळणे
    पार्ले
    लोहारे
    माटवण
    हार्वे
    माहळुंगे

पर्सुले

  1. रोहा :-
    तिसे
    वालुंजवाडी
    र्गिने
    घोसाले
    आरे बुद्रुक
    वांडोली (मधली खुर्द)
    सांभे
    नादवली
    वावे खार
    पाले बुद्रुक
    पडम
    पाले खुर्द

महादेव वाडी

  1. माणगाव :-
    न्हावे
    रेपोली
    आदघर
    पहेल

घारल

  1. सुधागड :-
    कान्हीवली
    भालगुले

माणगाव खुर्द

  1. तळा :-

पुस्तेवाडी

  1. पनवेल :-
    मालधुंगे (सत्याचीवाडी)
    धोंडनी (चिंचवाडी)
    धोंडनी

ML/KA/PGB
25 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *