मराठी नाट्य परिषदेचे १०० वे विभागीय नाट्य संमेलन नागपुरात

 मराठी नाट्य परिषदेचे १०० वे विभागीय नाट्य संमेलन नागपुरात

नागपूर दि १५ — अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनाचे हे वर्ष आहे. महाराष्ट्रात सर्वत्र हे नाट्य संमेलन विभागीय स्‍तरावर अतिशय जल्लोषात आणि आनंदात संपन्न होत आहे. नागपूर विभागाचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे नाट्य संमेलन येत्‍या, २४ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्‍यक्ष, अभिनेते प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या संमेलनात व्यावसायिक नाटक, लोककलेवरील कार्यक्रम, स्थानिक शाखेचे तसेच कलावंतांचे सादरीकरण तसेच बाल कलावंतांची विशेष प्रस्तुती असणार आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते उद्घाटन २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला नागपूर शहराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, स्थानिक आमदारांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि १०० व्या नाट्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आणि सुप्रसिद्ध चित्रपट कलावंत यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

‘झाडीपट्टी’ चे रंग २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पूर्व वैदर्भीय जिल्ह्यात झाडीपट्टी रंगभूमीची सांस्कृतिक परंपरा सांगणारा आणि लोककलेला जिवंत ठेवणा-या झाडीपट्टीच्या रंगभूमीची स्वतंत्र ओळख करून देण्याच्या दृष्टीने. ‘शतकोत्तर झाडीपट्टी’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात सुमारे १५० कलावंतांचे सादरीकरण होणार असून झाडीपट्टी रंगभूमीवरील १५ समूह यात सहभागी होणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते समारोप २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता बालरंगभूमी परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालकलाकारांचे आणि दिव्यांग मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून दुपारी १२ वाजता नागपूर शाखेतर्फे संपन्न झालेल्या १०० नाट्य संमेलनावर प्रकाश टाकणारा ‘शतकीय संमेलनाची वारी’ ही नाट्यधारा सादर होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता दंडार, तमाशा, आणि खडीगंमत यासारखे लोककलेचे कार्यक्रम सादर होणार आहेत.
संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली १०० व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा संपन्न होणार आहे. या समारोप सोहळ्याला बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेत्री ॲड . नीलम शिर्के सामंत तसेच स्थानिक आमदार आणि मातब्बर कलावंत प्रामुख्याने उपस्थिती असणार आहेत.

पत्रकार परिषदेला प्रशांत दामले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नरेश गडेकर केंद्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अजय पाटील अध्यक्ष – नागपूर शाखा , सलीम शेख अध्यक्ष – नागपूर उपनगर १, संजय रहाटे कार्यकारीणी सदस्य, मुंबई आदी उपस्थित होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *