मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त 100 तरुणींना केली सायकल वाटप

 मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त 100 तरुणींना केली सायकल वाटप

मुंबई, दि २४
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून लेक लाडकी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र धुमाळे यांच्यावतीने १०० लेकींना वडाळा येथे सायकल वाटप करण्यात आल्या. आम्ही दरवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपून आम्ही विभागातील तरुणींना मोफत सायकल वाटप केल्या. या कार्यक्रमातून विभागातील गोरगरीब गरजू शालेय विद्यार्थ्यांना याचा उपयोग झाला असून यापुढे देखील आम्ही असेच सामाजिक कार्य करत राहणार असल्याची माहिती दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक गजेंद्र धुमाळे यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड , चित्राताई वाघ, सिद्धिविनायक न्यास कोषध्यक्ष पवन त्रिपाठी , जिल्हा अध्यक्ष राजेश शिरवाडकर, जिल्हाध्यक्ष निरज उभारे, महामंत्री विलास आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *