मराठा आंदोलन कर्त्यांसाठी उदगीर वरून आणल्या 1000 भाकऱ्या

मुंबई, दि 1
गेल्या दोन-तीन दिवसापासून नांदेडमध्ये सुरू असलेला आंदोलनात पहिल्या दुसऱ्या दिवशी जेवणाचे आंदोलनकर्त्यांचे फार हाल झाले होते. ही बाब लक्षात घेऊन अनेक संस्था तसेच दानशूर व्यक्तिमत्व पुढे सरकावले असून आता आंदोलन करताना उदगीर येथून जेवणासाठी हजार भाकऱ्या आणि साजूक लोणी टेम्पो मध्ये भरून आणले असून ते आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांना वितरित करण्यात आले. या भाकऱ्या आणि लोणी खाऊन मराठा आंदोलन करते तृप्त झाले. गेल्या अनेक दिवसापासून आमचे हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे परंतु आमचे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जेवणाची आणि पिण्याचे पाण्याचे फार मोठ्या प्रमाणात हाल झाले होते परंतु आता जेवणासाठी अनेक संस्था आणि दानशूर व्यक्तिमत्व पुढे आले असून आता आम्हाला जेवणाची कोणतीही कमतरता नसून आम्हाला मोबाईल प्रमाणे जेवण मिळत असल्याचे भावना येथील रवींद्र पाटील या मराठा बांधवांनी व्यक्त केली.KK/ML/MS