या राज्यात महिलांच्या खात्यात दर महिना जमा होणार १००० रुपये

 या राज्यात महिलांच्या खात्यात दर महिना जमा होणार १००० रुपये

छायाचित्र प्रातिनिधीक

रांची, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजण्यास आता अगदी काही महिनेच शिल्लक राहीले असताना मतदारांना खूश करण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.एकूण मतदार संख्येत निम्मा वाटा असणाऱ्या महिलावर्गाला खूश करण्यासाठी सरकार कडून विविध योजना जाहीर केल्या जात आहेत. अर्थात यामुळे महिलांचे काही प्रमाणात आर्थिक सबलीकरण होण्यास हातभार लागत आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राबविलेल्या लाडली बहना योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. मध्य प्रदेशपाठोपाठ आता छत्तीसगड सरकारसुध्दा राज्यातील महिलांच्या खात्यात प्रत्येक १ हजार रुपये देणार आहे. निवडणुकीत दिलेले महिला सशक्तीकरणाचे आश्वासन पूर्ण करण्याचा निर्णय छत्तीसगड सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी या योजनेबाबतची घोषणा केली. महतारी वंदना योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १ हजार रुपये असे वर्षाला १२ हजार रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरूवात झाली आहे. याचाच भाग म्हणून छत्तीसगडमधील महिलांसाठी महतारी वंदना योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना राबविण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. महतारी योजनेंतर्गत १ मार्च २०२४ पासून या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळण्यास सुरूवात होणार आहे. ५ फेब्रूवारीपासून या योजनेसाठीचे अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय १ जानेवारी २०२४ रोजी २१ वर्षे असणे आवश्यक आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने सत्तेत आल्यावर महिलांसाठी महतारी वंदना योजना सुरू करण्याचे जाहीर केले होते. मध्य प्रदेशमधील लाडली बहना योजनेप्रमाणेच भाजपला पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्यासाठी याचा उपयोग झाल्याचे मानले जात आहे. सध्या या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

SL/KA/SL

10 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *