राम मंदिराला 100 वर्ष पूर्ण, राम झुला येथे दिव्यांची सजावट

नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 4 मार्च 1923 रोजी नागपूरात पोद्दारेश्वर राम मंदिराची स्थापना करण्यात आलेली होती. नागपूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य मंदिर नागपुरातील प्रसिद्ध असलेल्या रामझुलाच्या पुलावर काल दिव्यांची आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आली होती.100 years of Ram temple, decoration of lamps at Ram Jhula
मंदिराच्या बाजूला असलेल्या रामझुलाच्या पुलावर श्री राम जय राम जय जय राम, धनुष्यबाण, त्रिशूल, स्वस्तिक, गदा, पोद्दारेश्वर राम मंदिर, भगवान तिरुपती बालाजी यांचा टिळा, शंख आदी दिव्यांच्या प्रकाशाने लख्ख करण्यात आलेले होते. 51 हजार दिवे यावेळेला लावण्यात आलेले होते.
ही आकर्षक रोषणाई बघण्यासाठी शहरातील नागरिकांनी देखील मोठया प्रमाणात गर्दी केलेली दिसत होती.
ML/KA/PGB
5 Mar. 2023