१००% इथेनॉलवर चालणारी कार लाँच

 १००% इथेनॉलवर चालणारी कार लाँच

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या प्रदुषणावर मात करण्यासाठी हरित इंधनावर चालणाऱ्या गाड्या विकसित करण्यासाठी विविध वाहन कंपन्या प्रयत्न करत आहेत. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या एमपीव्ही इनोव्हा हायक्राॅसचे उद्घाटन करण्यात आले. ही इनोव्हा हायक्रॉस इथेनॉलसहित ईव्हीवरही चालू शकणार आहे. इनोव्हा इलेक्ट्रिक फ्लेक्स – फ्यूएल सर्टिफिकेट्ससह भारत स्टेज ६ वाहनांसह येणारे हे पहिले बेस्ड माँडेल ठरले आहे.

या लॉन्च प्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आपण 16 लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो. त्यामुळे 40 टक्के जल वायू प्रदूषण होते. जेव्हा इथेनॉलची अर्थव्यवस्था 2 लाख कोटींची होईल, तेव्हा शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था 12 लाख कोटींवरून 20 लाख कोटींवर जाईल. एक दिवस देशात असा प्रसंग येईल की सगळी वाहने इथेनॉलवर चालतील. पेट्रोल डिझेलची आयात पूर्णपणे बंद केली जाईल.

इथेनॉल हे अत्यंत पर्यावरण पूरक इंधन आहे. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. उसाच्या रसापासुन साखर बनवितांना मळी (मोलॅसिस) तयार होते. त्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल तयार होते. हा द्रवपदार्थ ज्वलनशील असल्यामुळे याचा वापर पेट्रोल डिझेल आदी इंधनात मिसळुन करता येऊ शकतो. ब्राझिल देश हा या प्रकारचा वापर जास्तीत जास्त करण्यात आघाडीवर आहे.

SL/KA/SL

29 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *