100 दिवसात 100 डिजिटल आश्रमशाळा
नागपूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा आदिवासी विकास विभागाने पहिल्या 100 दिवसांचा आराखडा तयार केला असून या 100 दिवसात 100 डिजिटल आश्रमशाळा तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊइके यांनी आज नागपुरात दिली. ते नागपूरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
पहिल्या 100 दिवसात डिजिटल शाळेसह आदिवासी वसतिगृहात उत्तम व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असून ज्या भागात वसतिगृह नाही अश्या ठिकाणी नविन वसतिगृह बांधण्यात येणार आहे . तसेच जिल्ह्याचा ठिकाणी एक सांस्कृतिक सभागृह उभारणार असल्याचेही आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक ऊइके यांनी यावेळी सांगितले. राज्यात आदिवासी विकास विभागाचा ज्या चांगल्या शाळा आहेत त्या ठिकाणी कौशल्य विकासाला चालना देऊन विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला पाहिजे अश्या प्रकाराची वाटचाल आदिवासी विकास विभाग करणार असल्याचेही मंत्री डॉ ऊइके यांनी सांगितले.
ML/ML/SL
3 Jan. 2025