रायगड जिल्ह्यातील १० यात्रेकरू अडकले केदारनाथ खोऱ्यात
अलिबाग दि ३ केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसानंतर तसेच झालेल्या विध्वंसानंतर तिथे पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेलेल्या नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टाना सामोरं जावं लागत आहे. गौरीकुंड ते सोनप्रयाग पर्यंतचा रस्ता उद्ध्वस्त झाल्यामुळे हजारो नागरिक अडकून पडले आहेत.
तिथल्या सरकार कडून कुठल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत,अशी त्याठिकाणी अडकलेल्या नागरिकांची तक्रार असून बदलत्या वातावरणामुळे ते घाबरून गेले आहेत. कुठल्याही प्रकारचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने कुटुंबाशी संपर्क साधणे कठीण होऊन बसले आहे. काल आलेल्या हेलिकॉप्टरने दिवसभरात १६ नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आले. आमचे इथे खाण्यापिण्याचे देखील हाल होतात. आम्हाला इथून सुरक्षित हलवा अशी याचना हे नागरिक करीत आहेत.
अडकलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील शेकडो नागरिकांचा समावेश आहे.
त्यात महाड येथील उद्योजक गोपाळ मोरे यांचाही समावेश आहे. महाडचे आमदार भरत गोगावले, विकास गोगावले यांनी आमच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले परंतु इथलं सरकार आणि प्रशासन त्याला प्रतिसाद देत नसल्याची तक्रार मोरे यांची आहे. गोपाल मोरे यांनी या भूसंकलनात खूप मोठी मदत करून नागरिकांना जीवदान दिले मात्र आता ते स्वतःच अडकून पडले आहेत.
या उत्सव समितीचे अध्यक्ष मेहर योगेंद्र रावत ही कोणती दखल घेत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील यात्रेकरू आता प्रचंड घाबरलेल्या मनस्थितीत आहेत आम्हाला लवकरात लवकर मदत करून सुटका करावी अशी मागणी करत आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील १० यात्रेकरू अडकले आहेत.