छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्लात 10 जवान शहीद

दंतेवाडा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. हे जवान जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) युनिटचे होते. याशिवाय त्यांच्या वाहनाच्या चालकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांची टीम पावसात अडकलेल्या सुरक्षा दलांना वाचवण्यासाठी जात होती. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटात पोलिसांचे वाहन उडवले.
दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अरणपूर-समेलीदरम्यान हा हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली आहे. या चकमकीदरम्यान माओवाद्यांनी वाहनावर बॉम्ब फेकले.
बस्तरमध्ये नक्षलवाद्यांची TCOC (टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) सुरू आहे. या काळात अनेकदा नक्षलवादी अनेक मोठ्या घटना घडवून आणतात. टीसीओसीच्या पार्श्वभूमीवर फोर्सदेखील अलर्ट मोडवर आहे. बस्तरच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शोधासाठी जवान पाठवले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, दंतेवाडा येथे छत्तीसगड पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. शोकग्रस्त कुटुंबांप्रति माझ्या संवेदना.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. म्हणाले- शहिदांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना. नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले आहे.
पाच दिवसांपूर्वीच सुरक्षा दलांनी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंसह मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये जवळपास 25 ते 30 नक्षलवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. जवान आल्याची माहिती मिळताच सर्व नक्षलवादी पळून गेले.
SL/KA/SL
26 April 2023