IRCTC च्या नफ्यात 10% वाढ

 IRCTC च्या नफ्यात 10% वाढ

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) चा आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) नफा वार्षिक आधारावर 13.7% वाढून ₹341 कोटी झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा ₹300 कोटी होता. IRCTC द्वारे केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी, इंटरनेट तिकीट, प्रवास आणि पर्यटन तसेच पॅकेज्ड पिण्याचे पाणी (रेल नीर) या सेवा दिल्या जातात.

कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 10% वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 25 च्या तिसऱ्या तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल ₹1,224.7 कोटी होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत महसूल ₹1,115.5 कोटी होता. IRCTC नेआज म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.

IRCTC ची स्थापना 27 सप्टेंबर 1999 रोजी भारतीय रेल्वेची एक शाखा म्हणून करण्यात आली. स्थानके, रेल्वे आणि इतर ठिकाणी खानपान आणि आदरातिथ्य व्यवस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच, बजेट हॉटेल्स, विशेष टूर पॅकेजेस, माहिती आणि व्यावसायिक प्रसिद्धी आणि जागतिक आरक्षण प्रणालीच्या विकासाद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. आयआरसीटीसीचे कॉर्पोरेट कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.

SL/ML/SL

11 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *