१ कोटींचे पॅकेज, फक्त ६ तास काम, तरीही कर्मचारी मिळेनात

 १ कोटींचे पॅकेज, फक्त ६ तास काम, तरीही कर्मचारी मिळेनात

डेकोटा, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोट्यावधींची पॅकेजेस देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्याकडून दिवसातील जास्तीत जास्त वेळ काम करवून घेतात. अमेरिकेमध्ये एक अजब नोकरीचा ऑफर समोर आली आहे. इथे दिवसाला फक्त सहा तास काम करण्यासाठी एक कोटींचे पॅकेज देण्यात येणार आहे. म्हणजेच कंपनी या कामासाठी १००००० पाऊंड म्हणजेच जवळपास १ कोटी रुपये वर्षाला द्यायला तयार आहे.आणि तरी देखील कर्मचारी मिळत नाहीत. कारण कामही तसेच जोखमीचे आहे.

सोशल मीडियावर नोकरीची ही ऑफर चर्चेचा विषय ठरत आहे. या जाहिरातीनुसार ही नोकरी टॉवर लालटेन चेंजरची आहे. अमेरिकेच्या साऊथ डेकोटा भागामध्ये ही नोकरी मिळत आहे. मात्र टॉवर लालटेनचा जॉब वाटतो तितका सोपा नाही. हे टॉवर सामान्य टॉवरपेक्षा वेगळे असतात. जमिनीपासून टॉवरच्या टोकाच्या दिशेने जाताना तो निमुळता होत असल्याने ही चढाई अत्यंत अवघड होत जाते. एवढच नाही तर टॉवरच्या टोकावर १०० किमी प्रती तासाच्या वेगाने वारा वाहतो. या टॉवरवर चढताना फक्त एका दोरीचा सहारा असतो. टॉवरवर चढण्यासाठी तब्बल ३ तासांचा कालावधी लागतो तसंच उतरायलाही तेवढाच वेळ लागतो. म्हणजेच काम करण्यासाठी ६-७ तास लागतात. प्रत्येक ६ महिन्यांमधून एकदा किंवा दोनदाच टॉवरवर बल्ब बदलण्यासाठी जावं लागतं.

या जाहिरातीला टिकटॉक युजर @Science8888 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलं होतं, मात्र यासाठीच्या अटी पाहून तुम्हीही गोंधळून जालं. कारण, काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला उंचीची भीती नसावी, तसंच तो शारिरिकदृष्ट्या फिट असला पाहिजे. एका वर्षाचा अनुभव असलेली व्यक्तीही या जॉबसाठी अप्लाय करू शकते. तसंच पगार अनुभवावर आधारित असेल. नोकरी मिळाल्यानंतर व्यक्तीला सहा महिन्यांमध्ये एक किंवा दोन वेळा टॉवरवर चढावं लागेल. तर जीवाची बाजी लावून आता कोण शूर पठ्ठ्या या कोटींच्या पॅकेजच्या नोकरीचा धनी होतो, याबाबत आता नेटकरी चर्चा करत आहेत.

SL/KA/SL
17 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *