हेरिटेज ऑन व्हील Vintage Car आणि Bike चे प्रदर्शन

नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपुरातील रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडळ, जयका मोटर्स आणि सीवा यांच्या संयुक्त विद्यमाने रामन विज्ञान केंद्राच्या परिसरात हेरिटेज ऑन व्हील Vintage Car आणि Bike प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते. या एक दिवसीय प्रदर्शनीचे उदघाटन नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये जुन्या काळातील कार आणि दुचाकी वाहन ठेवण्यात आली होती. 100 वर्षा अगोदरच्या काळातील जुन्या गाड्या 1959,1960 मधील स्कूटर कश्या होत्या तसेच बी.एम. डब्लू नविन आणि जुन्या बाईक, ट्रान्सपोर्ट वाहन, जुन्या काळातील कार, दुचाकी वाहन येथे ठेवण्यात आल्या होत्या , ज्या बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
ML/ML/PGB 16 Feb 2025