वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान 17 एप्रिल रोजी राहणार खुले

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : श्रीराम नवमी निमित्त बुधवार १७ एप्रिल रोजी सार्वजनिक सुटी असली तरी बुधवारी १७ एप्रिल रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार १८ एप्रिल रोजी बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळवण्यात आले आहे.
भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.
या ठरावानुसार बुधवार १७ एप्रिल रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
SW/ML/SL
15 April 2024