राज्यात जंगलराज सुरू असल्याची काँग्रेसची टीका

मुंबई दि २– महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे संपली असून राज्यात जंगलराज आणले आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटद्वारे केली आहे.
महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे संपली असून राज्यात जंगलराज आणले आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे, त्यांनी ट्विट करत पूर्णवेळ गृहमंत्री नेमण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत हे दर्शवणारे आहे. खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढणा-यांना अटक होत नाही म्हणून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे पोलीस स्टेशनमध्ये बसून होत्या.
गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. सुरक्षारक्षक असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. राज्यात माता भगिणी सुरक्षित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदीचा राजीनामा देऊन राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्री द्यावा अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत हे दर्शवणारे आहे. खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढणा-यांना अटक होत नाही म्हणून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे पोलीस स्टेशनमध्ये बसून आहेत.
गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. सुरक्षारक्षक असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. राज्यात माता भगिणी सुरक्षित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदीचा राजीनामा देऊन राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्री द्यावा.