रविचंद्नन अश्विनने केली विक्रमी विकेट घेत, कपील देवशी केली बरोबरी

 रविचंद्नन अश्विनने केली विक्रमी विकेट घेत, कपील देवशी केली बरोबरी

हैदराबाद, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे भारत- इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी अश्विनच्या गोलंदाजीची जादू केली आहे. अश्विनने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला त्रिफळाचीत केले. आपण बाद झालो, हे बेन स्टोक्सलाही समजले नाही, इतक्या नजाकतीने अश्विनने त्याला बाद केले आहे. अश्विनच्या या चेंडूचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये अश्विनचा चेंडू नेमका कसा वळाला हे स्पष्टपणे दिसत आहे. बेन स्टोक्सला बाद करत अश्विनने यावेळी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा मोठा विक्रम आपल्या नावावर करताना त्याने महान कर्णधार कपिल देव यांच्याशी बरोबरी केली आहे.

आज तिसऱ्या दिवशी जेव्हा इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरला तेव्हा त्यांनी चांगली सुरुवात केली होती. इंग्लंडच्या सलामीवीरांनी ४५ धावा केल्या होत्या. त्यावेळी भारताला विकेट्सची गरज होती. त्यावेळी भारताने विकेट मिळवली नसती तर इंग्लंडचा संघ त्यांना बॅकफूटवर ढकलू शकत होता.यावेळी अश्विन भारताचा तारणहार ठरला.अश्विनने यावेळी इंग्लंडला पहिला धक्का दिला. अश्विनने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्राऊलीला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले.

त्यानंतर भारतासाठी बेन स्टोक्स हा डोकेदुखी ठरू शकला असता. कारण पहिल्या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे आता दुसऱ्या डावात तो किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण यावेळी स्टोक्सला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कारण अश्विनने यावेळी अप्रतिम चेंडू टाकला आणि बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड केले. यावेळी आपण बाद झालो की नाही, हे बेन स्टोक्सलाही समजले नाही. बेन स्टोक्सला यावेळी फक्त सहा धावाच करता आल्या.

अश्विनने कसोटी कारकिर्दीत तब्बल १२ वेळा बेन स्टोक्सला बाद केले आहे. भारताकडून एका खेळाडूला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रमाशी यावेळी अश्विनने कपिल देव यांच्याशी बरोबरी केली आहे. कारण यापूर्वी कपिल देव यांनी मुदस्सर नजरला १२ वेळा बाद केले आहे. पण आता जर अश्विनने या मालिकेत बेन स्टोक्सला एकदा तरी बाद केले तर त्याच्या नावावर इतिहास लिहिला जाऊ शकतो. त्यामुळे आता अश्विन या मालिकेत बेन स्टोक्सला बाद करोत की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

SL/KA/SL

27 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *