माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ल्याची धमकी
मुंबई दि.30(एम एमसी न्यूज नेटवर्क):
मुंबईच्या वांद्रेमधील प्रसिद्ध अशा माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे .पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने गुरुवारी ईमेलद्वारे
चर्चमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन
वांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (३) नुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या धमकीच्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे. दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर या परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. ख्रिसमस सण नुकताच साजरा झालेला आहे. त्यानंतर ही धमकी प्राप्त झाल्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. माऊंट मेरी चर्च हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण असून याठिकाणी पर्यटक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात.
SW/KA/SL
30 Dec. 2022