मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून “क्षयरोग मुक्त भारत” साठी प्रतिज्ञा

 मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून “क्षयरोग मुक्त भारत” साठी प्रतिज्ञा

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या 100 दिवसांच्या सघन मोहिमेअंतर्गत, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी आज (दि.7 )फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “क्षयरोग मुक्त भारत” साठी प्रतिज्ञा दिली.यावेळी महाव्यवस्थापकांनी क्षयरोग निर्मूलन मोहिमेचे महत्त्व स्पष्ट करत, या आजाराविषयी जनजागृती करणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे किती गरजेचे आहे, यावर भर दिला. “टीबी हरेल, देश जिंकेल” ही घोषणाही या वेळी उपस्थितांनी दिली.या उपक्रमात मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. श्रीमती शोभा जगन्नाथ, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम हा भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा एक उपक्रम असून, 7 डिसेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम देशभर क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापक जनजागृती मोहीम म्हणून राबवला जात आहे.या मोहिमेअंतर्गत, मध्य रेल्वेच्या वैद्यकीय विभागाने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये विविध विभाग आणि मुख्यालयांमध्ये रॅली, पथनाट्य आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करून क्षयरोगाबाबतच्या गैरसमजांना दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ML/ML/PGB 7 Feb 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *