बीड जिल्ह्यात पावसामुळे नद्या नाल्यांना पूर
बीड दि १७– जिल्ह्यात अनेक भागात काल रात्री जोरदार पाऊस झाला.जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील कडी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे तयार केलेला तात्पुरता पूल वाहून गेला. सकाळपर्यंत या पुलावरून वाहतूक होत होती.मात्र सकाळी अचानक नदीला पाणी वाढल्याने तयार केलेला तात्पुरता पूल वाहून गेला.हा पूल वाहून जाण्याची ही दुसरी घटना आहे.
पूल वाहून गेल्यानंतर नगर बीड रस्त्यावरची वाहतूक काही काळ थांबली होती.काही वेळानंतर नवीन तयार होत असलेल्या पुलावरून ही तात्पुरती वाहतूक वळवण्यात आली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरामध्ये तसेच गर्भगिरीच्या डोंगरपट्ट्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे नद्यांना पूर आले आहेत.