पर्यावरण नियमांचा भंग करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा बडगा
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण नियमांचा भंग करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मेडीलाइफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ऑक्सिकेअर हॉस्पिटल या दोन रुग्णालयांना मंडळाने नोटीस बजावली आहे. या दोन्ही रुग्णालयांवर कठोर कारवाई का करू नये, अशी विचारणा मंडळाने केली आहे. दरम्यान, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने मंडळाच्या कारवाईला आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरीतील काळेवाडी येथील मेडीलाइफ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि वाल्हेकरवाडीतील ऑक्सिकेअर हॉस्पिटलला ११ नोव्हेंबरला नोटीस बजावली. या रुग्णालयांकडून पर्यावरण नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार मंडळाकडे करण्यात आली होती. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तिची दखल घेत दोन्ही रुग्णालयांना भेट दिली. भेटीत रुग्णालयांकडून पर्यावरण नियमांचे पालन केले जात नसल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे त्यांना नोटीस बजाविण्यात आली.
ML/ML/PGB
17 Nov 2024