देशातील पहिले AI क्लिनिक ग्रेटर नोएडमध्ये सुरू
नवी दिल्ली, दि. ७ : ग्रेटर नोएडा येथील शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था (GIMS) येथे देशातील पहिले सरकारी AI क्लिनिक सुरू झाले आहे. ४ जानेवारी ला या AI क्लिनिकची सुरुवात झाली. क्लिनिकमध्ये कर्करोग, हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यासारख्या गंभीर आजारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अनुवांशिक स्क्रीनिंगचा वापर केला जाईल.
या क्लिनिकमध्ये एआयच्या माध्यमातून रक्त चाचण्या, स्कॅन आणि जेनेटिक डेटाचे विश्लेषण करून रोगांचे निदान केले जाईल आणि उपचारानंतर बरे होण्याचे मूल्यांकन देखील केले जाईल. AI प्रणाली रिअल-टाइममध्ये रुग्णांच्या लक्षणांचे विश्लेषण करण्यास मदत करते. AI क्लिनिकचा एक मोठा फायदा म्हणजे ते ग्रामीण भारतासारख्या दुर्गम किंवा वंचित भागात आरोग्य सेवा देतात.
याबाबत माहिती देताना GIMS चे संचालक ब्रिगेडियर डॉ. राकेशकुमार गुप्ता यांनी सांगितले की, हे क्लिनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अनुवांशिक स्क्रीनिंगचा वापर करून रक्त चाचण्या, इमेजिंग स्कॅन आणि इतर क्लिनिकल डेटाचे विश्लेषण करेल. यासह, AI टूल्स एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, MIR अहवाल आणि प्रयोगशाळेतील तपासणीचे विश्लेषण देखील करतील. यामुळे सुरुवातीलाच गंभीर आजाराचे निदान होऊ शकेल.
SL/ML/SL