कोल्हापुरात धरणक्षेत्रात अतिवृष्टी, पुराचा धोका कायम

कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर जिल्ह्यात धरण परिसरात अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडलेले असून राधानगरी आणि वारणातून विसर्ग वाढला आहे, यामुळे जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे. दरम्यान अलमट्टीतून साडेतीन लाख क्युसेक्सने विसर्ग आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी धोकारेषेच्या आत असून
आज सकाळी पाच वाजता ४२.५ फूट होती. धोका पातळीत 43 फूट आहे. मात्र ‘पंचगंगा’ नदीची पातळी आज वाढण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अद्याप ७५ बंधारे पाण्याखाली आहेत.
निपाणी-राधानगरी मार्ग पुन्हा बंद झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे अद्याप एसटीचे २३ मार्ग बंदअसून सध्या राधानगरी धरणाचे सातपैकी चार स्वयंचलित दरवाजे खुले आहेत, त्यातून ५ हजार ६१२ क्युसेक्स विसर्ग तर वीज निर्मिती केंद्रातून १५०० क्युसेक्स असा एकूण ७ हजार २१२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.

२०१९ नंतर प्रथमच २०२४ मध्ये राधानगरी धरणाचे सात ही दरवाजे उघडले गेले. जिल्ह्यात आठ तालुक्यांत अतिवृष्टी झाली.पन्हाळा, शाहूवाडी,गगनबावडा, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड तालुक्यांना पावसानं झोडपून काढल्यानं नागरिकांची पुन्हा धाकधूक वाढली आहे.

राधानगरी तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सोळांकुर इथं डोंगराचा काही भाग खचला आहे. काळम्मावाडी परिसरात
काल पहाटे ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं दूधगंगा धरणाच्या सांडव्यावरून ७ हजार ६०० क्युसेक्स तर जलविद्युत केंद्रातून १५०० क्युसेक्स असा ११ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
आजही कायम ठेवला आहे.
धरण परिक्षेत्रात ढगफुटीसदृश
पाऊस झाल्यानं केवळ आठ तासांत ९१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

धरणाची जलाशयाची पातळी
६४२.९४ मीटर असून, पाणीसाठा ६१७.९७२ द.ल.घ.मी. इतका झाला आहे. काल दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस झाल्यानं राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत पण, काल दुपारी राधानगरीचे तीन दरवाजे बंद झाल्यानं विसर्ग कमी झाला होता.
सध्या पुराचं पाणी संथगतीनं कमी होत असून, अद्याप ७५ बंधारे पाण्याखाली आहेत. काल दिवसभर पंचगंगेची पातळी अर्ध्या फुटानं कमी होऊन आज सकाळी पाच वाजता धोका पातळीच्या (४२.५ फूट) आत आली आहे.

मात्र आज राधानगरी धरणातून आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अलमट्टी धरणातील पाणीसाठा ६७.६२ टीएमसी झाला असून, ३.२३ लाख क्युसेक्सने पाण्याची आवक होत आहे. सध्या अलमट्टी धरणातून ३.५० लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे,असं पाटबंधारे विभागानं सांगितलं आहे.

ML/ML/PGB
1 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *