काँग्रेस प्रदेसाध्यक्षांच्या वक्तव्यावर गदारोळ

 काँग्रेस प्रदेसाध्यक्षांच्या वक्तव्यावर गदारोळ

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रूर औरंगजेबाशी तुलना करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. विधानपरिषदेत सत्ताधारी सदस्यांनी हौद्यात उतरून सपकाळ यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं.

आज कामकाज सुरू होताच भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला.उत्तम प्रशासक म्हणून राज्याचा कारभार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करून सपकाळ यांनी अत्यंत निंदनीय कृत्य केलं असून हा महाराष्ट्राचा अपमान आहे,
अशी टीका दरेकर यांनी यावेळी बोलताना केली.

सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी आणि त्यांना समज द्यावी अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी देखील सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोणावरही अशाप्रकारची व्यक्तिगत टीका करू नये असं मत मांडतानाच हे सरकार औरंगजेबी वृत्तीचं आहे असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी देखील दानवे यांच्या मताचं आणि आरोपाचं समर्थन केलं.
हर्षवर्धन सपकाळ यांनी अशाप्रकारचं वक्तव्य केलंच नाही असं काँग्रेसचे भाई जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

सपकाळ यांचं वक्तव्य निषेधार्ह असून कठोर कारवाईच्या मागणीवर सरकार गांभीर्याने विचार करेल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहाला दिलं. विधानसभेत ही अशीच मागणी भाजपाच्या रणजीत सावरकर यांनी केली, त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देत संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासीत केलं.

ML/ML/PGB 17 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *