उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर आयुक्तांनी केली निलंबनाची कारवाई
ठाणे दि ४ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, त्याची गांभीर्यपूर्वक दखल घेत पालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांना ०२ ऑक्टोबरपासून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याबद्दलचा आदेश शनिवार, ०४ ऑक्टोबर रोजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जारी केला आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करुन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शंकर पाटोळे, उप आयुक्त, परिमंडळ-२ यांना दि.०२.१०.२०२५ पासून निलंबित केले आहे. पाटोळे यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आलेली आहे. पाटोळे यांना बांधकाम व्यावसायिकांकडून पंचवीस लाखांची लाच घेताना त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे अतिक्रमण विरोधी पथक कक्षाचा कार्यभार होता.
ML/ML/SL
4 Oct. 2025