आरोग्य विभागाद्वारे राबविण्यात येणार कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान

 आरोग्य विभागाद्वारे राबविण्यात येणार कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२३-२४ मध्ये दर हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १.१६ इतके होते ते २०२४-२५ मध्ये म्हणजे सप्टेंबर २०२४ अखेरीस १.०७ इतके झाले आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्याचा निर्धार आरोग्य विभागाने केला आहे. राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नवनर्षात ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष घरोघर जाऊन कुष्ठरोग व क्षयरोग शोध अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामीण व निवडक शहरी भागातील सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार नागरिकांचे सर्वेक्षण या कालावधीत करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.

राज्यातील सर्व ग्रामीण व निवडक शहरी भागात कुष्ठरोग सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी ७०,७६८ शोध पथके तयार कऱण्यात येणार असून, १ कोटी ७३ लाख घरांना भेटी देऊन कुष्ठरोग व क्षयरोगाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येतो.या दिवशी कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्रासाठी शपथ देण्यात येणार आहे. कुष्ठरोगाविषयी व्यापक लोकजागृती करण्यासाठी २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहेत

SL/ML/SL

1 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *