अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खदान पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत या मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या दोद्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे तर महिला आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे. आरोपीमध्ये सादीक शाह लतिफ शाह, अफरोज खान व एका महिलेचा समावेश आहे.

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी अल्पवयीन मुलगी घरी असताना आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचे मोबाइलमध्ये फोटो काढले व तिचा विनयभंग केला. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बदनामी करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने खोलीमध्ये बंद करून निघून गेले. त्यानंतर पीडितेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. याबाबत काहीही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीमुळे आई-वडिलांनी पीडितेला मोठ्या बहिणीसोबत बाहेरगावी पाठवून दिले.

तत्पूर्वी आरोपी शाह व खान याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली होती. या प्रकरणी खदान पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सादिक शाह लतिफ शाह, अफरोज खान व आणखी एका महिलेविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय सायरे करीत असतानाच दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.तर महिला आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

ML/ML/PGB
21 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *