अंदमान निकोबारमधील शासकीय योजनांच्या कामाचा आठवले यांनी घेतला आढावा

पोर्टब्लेयर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील भारत सरकारच्या विविध योजनांच्या कामाचा आढावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पोर्टब्लेयर येथे सर्व शासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत घेतला.
अंदमान निकोबारमधील विकासाच्या कामांना तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले.
अंदमान निकोबार या केंद्रशासीत प्रदेशाचे 8249 किलोमीटर क्षेत्रफळ आहे. सन 2011 च्या जणगणनेनुसार येथील एकूण लोकसंख्या 3 लाख 80 हजार एवढी आहे. येथे एकुण 70 गावे आहेत. एक नगरपालिका आहे. 7 ग्रामपंचायत समिती आहेत. येथे लोकसभा मतदारसंघासाठी 3 लाख 8 हजार नोंदणीकृत मतदार आहेत. अंदमान निकोबारमध्ये 65 टक्के ओबीसी लोकसंख्या आहे. आदिवासी लोकांची 7.5 टक्के लोकसंख्या आहे. ओबीसी स्कॉलरशिपसाठी केंद्र सरकारचे 60 लाखांची मदत यावर्षी मिळाली आहे.
येथे 2006 ते 2023 या 17 वर्षांच्या काळात केवळ 40 अॅट्रोसीटी केसेस झालेले आहेत. 2023 मध्ये अॅट्रोसीटीच्या फक्त 2 केसेस झालेल्या आहेत. येथे 15,185 ज्येष्ठ नागरिक आहेत. येथील ज्येष्ठ नागरिकांना 2500 पेंशन मिळते आणि 80 वर्षापेक्षा जास्त वय असणा-या नागरिकांना 3000 रुपये पेंशन मिळते. येथे एकूण 1600 सफाई कामगार आहेत. त्यांना प्रत्येकी 25 हजार पेक्षा जास्त पगार मिळतो. येथे 5601 दिव्यांगजण आहेत. 2 ओल्डेज होम आहेत.
शेडयुल्ड ट्राईब सब प्लान अंतर्गत भारत सरकारने 1 लाख 17 हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यातील अंदमान निकोबारला 226 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे.
अंदमान निकोबारचा भूभाग हा 94 टक्के जंगलाने व्यापलेला आहे. पोर्टब्लेयर पासुन सिंगापूर, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया हे देश जवळ आहेत. कलकत्ता ते पोर्टब्लेअर आणि चेन्नई ते पोर्टब्लेयर येथे समुद्र मार्गी जहाजाची प्रवासी वाहतूक नियमित होते. सर्व महानगरांशी पोर्टब्लेयर विमानतळ जोडलेले आहे. अंदमान निकोबारचे नैसर्गिक वातावरण येथे वर्षातून 9 महिने पाऊस पडत असतो. येथे विविध सरकारी यंत्रणेत 10 हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात. अंदमान निकोबारमध्ये पर्यटन आणि मासेमारी हे मुख्य व्यवसाय आहेत अशी माहिती शासकीय कामकाजाच्या बैठकीत अधिका-यांनी रामदास आठवले यांना दिली.
ML/KA/SL
23 Dec, 2023