कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात…

रत्नागिरी, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणात शिमगोत्सवाला सुरवात झाली आहे. गुहागर तालुक्यातील गिमवी गावात झोलाई देवीचा शिमगोत्सव दरवर्षी मोठया उत्साहात साजरा होतो. यानिमित्ताने ग्रामदेवता झोलाई देवी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते. मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि जत्रेत सहभागी होतात. गावच्या मंदिरात लाठ फिरवण्याची प्रथा आहे. या लाठेवर मानकरी विराजमान होतात.
ML/ML/PGB 9 mar 2025