मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई परिसरात रस्ते दुरूस्तीची कामे सुरूच असतात. पण चक्क चोरांनी फूटपाथचं काम असल्याचं सांगत तो आणखी खोदला. आणि लाखो रूपयांची केबल लंपास केली. ही तांब्याची केबल एमटीएनलची असून त्यांची किंमत ६ ते ७ लाख रुपये असावी. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण या घटनेची दादरमध्ये चांगलीच चर्चा […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे लालबागचा राजा. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती आहे. या राजाच्या दर्शनासाठी गणपतीत तुडूंब गर्दी असते. गणपती सुरू व्हायला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्याआधी गणरायाची मुर्ती साकारण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा मंगळवारी पार पडला. TM/ML/SL 11 June 2024Read More
धाराशिव, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात मागील काहीं दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात 12 जून पर्यंत सरासरी 123.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात 11 जून रोजी सकाळपर्यंत एकूण आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात धाराशिव तालुक्यातील ढोकी जागजी तुळजापूर तालुक्यातील सलगरा आणि ईटकळ कळंब तालुक्यातील शिराढोण आणि गोविंदपुर ,उमरगा तालुक्यातील नारंगवाडी […]Read More
सांगली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील सावळज सह परिसरातील गावामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ओढे – नाले भरुन वाहते झाल्याने अग्रणी नदीला पूर आला. अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदी पात्रातील पुलावरून पाणी वाहू लागले. या भागातील द्राक्षबागा पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत. तासगाव शहर आणि तालुक्यातील सर्व मंडळातील गावांना […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा हा प्रत्येकाचा आवडता ऋतू. पण या ऋतूत काही आजारही येतात त्यामुळे स्वतःची आणि घराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स: Here are some tips to take care of your health during monsoons TR/ML/PGB11 Jun 2024Read More
बीड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात अंबाजोगाई सह जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे यामुळे मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल सायंकाळपासून विजांच्या कडकडाटात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शेतात पाणी थळथळले आहे. बीड, आष्टी, पाटोदा वगळता इतर सर्व भागात […]Read More
जालना, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यात काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील घनसावंगी, परतूर, अंबड, जालना या तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या ककडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. मृगाच्या धारांनी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी राजा […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परिक्षेतील घोटाळा पाहता […]Read More
परभणी, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानवत तालुक्यातील मानोली शिवारात आज चारच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढ्याला पूर आला या पुरात दोन महिला वाहून गेल्या होत्या. यात सुनिता लव्हाळे( वय ४०) ही पुरात वाहून गेली तर दुसऱ्या महिलेने झाडाला घट्ट धरल्याने रंजना सुरवसे या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक वर्षा या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार उपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या आमदारांनी तशी पूर्वकल्पना पक्ष नेतृत्वाला दिलेली होती. या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यश अपयशाचा ऊहापोह करून आगामी […]Read More