जळगाव दि १४ — जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर आज अमरावती एक्स्प्रेसची ट्रकला धडक बसल्याने मोठा अपघात झाला मात्र त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. बंद असलेल्या रेल्वे गेट मधून धान्याने भरलेला ट्रक मध्येच आल्याने हा भीषण अपघात झाला. रेल्वे गेट पास करत असताना अचानक ट्रक बंद पडल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.रेल्वे ट्रॅकवर […]Read More
देशाच्या काही भागांमध्ये शुक्रवारी पहाटे भूकंपाचे हादरे बसले आहेत. लडाखच्या कारगिलमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. रात्री 2.50 मिनिटांपासून हे धक्के जाणवले. कारगिलसोबतच संपूर्ण लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते.Read More
आमिर खानचा आज १४ मार्च रोजी ६० वा वाढदिवस आहे. काल १३ मार्चला त्याने पत्रकारांबरोबर प्री बर्थडे सेलिब्रेशन केले. यावेळी त्याने मिडियासमोर त्याच्या नव्या पार्टनरची ओळख करून दिली. आमिरच्या या मैत्रीणीचं नाव आहे गौरी स्प्रेट. गौरी ही तमिळ व आयरिश आहे. त्यांची २५ वर्षांपासूनची मैत्री आहे. पण, गेल्या दीड वर्षांपासून ते डेट करत आहेत. गौरी […]Read More
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यांचा धाकटा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा 10 एप्रिलला साखरपुडा होणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न होणार आहे. साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा यांनी मोदीबागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. दोघांनी शरद पवारांना […]Read More
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज १४ मार्चला द्राक्ष महोत्सव करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.Read More
यवतमाळ, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ , वाशिम, नांदेड, अकोला इत्यादी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज वास्तव्याला आहे. हा समाज आपली पारंपरिक होळी आजही उत्साहात साजरी करतो. यावेळी महिला पारंपरिक वेशभूषा धारण करतात. तर पुरुष सुद्धा फेटा धोती शर्ट जॅकेट असा पेहराव परिधान करतात आणि डफडीच्या तालावर पारंपारिक गीते गात फेर धरून मोठ्या […]Read More
वाशीम दि १३:– वाशीम जिल्ह्यात सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मागील चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यात हळदीचे उत्पादन वाढले असून, नगदी पीक म्हणून हळदीला विशेष महत्त्व मिळत आहे.सुरुवातीला ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळद जमिनीतून उपटली जाते. त्यानंतर मजुरांच्या हाताने हळद वेचणी केली जात आहे. वर्षागणिक जिल्ह्यात हळद उत्पादक […]Read More
दिल्ली, 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे, असे देवेंद्र […]Read More