mmcnews mmcnews

कोकण

कोकणात यलो अलर्ट सह चक्रीवादळाचा इशारा

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गत काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्यपूर्ण बदल होत आहेत. एकीकडे उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे अवेळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत. गेल्या आठवड्यात कोकणातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तयार होत आलेल्या आंबा आणि काजू पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याने बागायतदार चिंतेत आहेत. त्यातच आज […]Read More

ट्रेण्डिंग

डिजिटल अरेस्टमुळे वृद्ध जोडप्याने केली आत्महत्या

बेळगावी, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकातील बेळगाव येथील एका वृद्ध जोडप्याने डिजिटल अटकेत ५० लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्यानंतर आत्महत्या केली. ८३ वर्षीय दियांगो नाझरेथ यांनी गळा चिरून आत्महत्या केली तर त्यांची पत्नी प्लेव्याना नाझरेथ (७९) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉलवर वृद्ध जोडप्याशी संपर्क साधला […]Read More

राजकीय

विकासाची महागुढी उभारू या! राष्ट्रधर्म वाढवू या!

मुंबई, दि. २९:- महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया. हा राष्ट्रधर्म वाढवू या, विकासाची महागुढी उभारू या! असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन वर्ष राज्यातील शेतकरी, […]Read More

मराठवाडा

श्रीतुळजाभवानी चरणी 1 किलो 100 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे

धाराशिव, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नियमित मोजणीसाठी काल तुळजाभवानी मंदिरातील दानपेटया उघडल्या असता देवीच्या मूळ गाभाऱ्यासमोर असलेल्या चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी मध्ये सोन्याची 11 बिस्किटे आढळून आली. यातील प्रत्येक बिस्कीट 100 ग्रॅम वजनाचे असून त्याचे एकूण वजन 1100 ग्रॅम आहे. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत जवळपास 1 कोटी इतकी आहे. मंदिर संस्थान येथे दानपेट्यांची मोजणी […]Read More

कोकण

रत्नागिरीचे दोन हजार डझन हापूस आंबे लंडनच्या बाजारात…

रत्नागिरी दि २९– युरोपमधील हापूस आंबा प्रेमींनी पहिल्या 21 पेट्यांना एक डझनाचा पाच हजार रुपये भाव दिला.पहिली दोन हजार डझन हापूस आंब्याची बॅच लंडन येथे रवाना झाली आहे . लंडनमध्ये राहणारा मराठी युवक तेजस भोसले , आमदार प्रसाद लाड, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी या कामांमध्ये पुढाकार घेतला आहे. दररोज 1000 डझन युरोपच्या मार्केटमध्ये हापूस […]Read More

विदर्भ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 30 मार्च रोजी महाराष्ट्र दौरा

नवी दिल्ली,28 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून, नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. .मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्स (UAVs) साठी 1250 मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित […]Read More

राजकीय

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुंबई, दि. २९:- राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. जानेवारी , फेब्रुवारी आणि मार्च असे ३ महिन्याचे अनुदान आहे. गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रती दिन प्रती गाय रु. ५०/- अनुदान योजनेर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठ पोलीस अधिकारी सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन…

मुंबई दि २९ :– आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. […]Read More

महानगर

भिवंडीत पर्यावरण रक्षणासाठी मियावाकी वृक्षारोपण …

भिवंडी दि २९ :- जंगल उध्वस्त केल्याने शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत असताना आता पर्यावरण रक्षणासाठी शहरात घन वन जंगल ही संकल्पना पुढे येत आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात यासाठी जपानी उद्यान तंत्रज्ञानाचा उपयोग करून मियावाकी उद्यान उभारले जात आहे. पालिका क्षेत्रातील म्हाडा कॉलनी येथील आरोग्य केंद्राच्या मोकळ्या जागेत मियावाकी उद्यान निर्माण केले जात आहे. अहमदाबाद […]Read More

ट्रेण्डिंग

श्री साईबाबा संस्थानच्या आय बँकेतून पहिले यशस्वी नेत्ररोपण

अहिल्यानगर दि २९ — शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामार्फत नुकत्‍याच सुरू झालेल्या नवीन आय बँकेच्या माध्यमातून पहिली नेत्ररोपण शस्त्रक्रिया काल यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील दृष्टीहीन शीतल शिवाजी पथवे या महिलेला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे. गेल्या आठवड्यात संस्थानच्या आय बँकेत पहिल्या नेत्रदानाची नोंद झाली होती. या नेत्रदानाच्या माध्यमातून आज […]Read More