mmcnews mmcnews

देश विदेश

मुंबई ते दुबई ट्रेनने जाता येणार! कसं शक्य होणार वाचा!

मुंबई ते दुबई प्रवास भविष्यात ट्रेनने करणं शक्य होणार आहे. या दोन शहरांना थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वेमार्ग उभारण्याची संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) योजना आहे. नॅशनल अ‍ॅडव्हायझर ब्यूरो लिमिटेडच्या योजनेनुसार, दुबई आणि मुंबई पाण्याखालील रेल्वे लिंकमुळे प्रवासाचा वेळ फक्त दोन तासांवर येणार आहे. ही अतिवेगवान रेल्वे ताशी ६०० ते १००० किलोमीटर वेगाने धावेल, असेही सांगण्यात आले […]Read More

देश विदेश

बॅटमॅन फेम प्रसिद्ध अभिनेता वेल किल्मर यांचं निधन

सुपरहिरो बॅटमॅनची क्रेझ आजही सगळ्यांना आहे. हॉलिवूडमध्ये याच बॅटमॅनच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेते वेल किल्मर (६५)यांचं मंगळवारी १ एप्रिलला लॉस एँजिलिसमध्ये निधन झालं. निमोनिया झाल्याने वेल यांची प्राणज्योत मालवली. वेल यांची मुलगी मर्सिडीज किल्मरने वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी सर्वांना सांगितली. अभिनेते किल्मर यांना त्यांच्या ‘बॅटमॅन फॉरएव्हर’, ‘टॉप गन’ आणि ‘टोम्बस्टोन’ यांसारख्या सिनेमांसाठी ओळखले जाते. त्यांच्या […]Read More

मराठवाडा

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका…

जालना, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसलाय. घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथील एका शेतकऱ्याचे मका पीक जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आडवे झाले आहे. जिरडगाव येथील शेतकरी पंढरीनाथ गायकवाड यांनी आपल्या शेतात मका पिकाची लागवड केली होते. पंढरीनाथ यांनी आपल्या मका पिकाची योग्य निगा राखल्याने मक्याचे पीक ही […]Read More

आरोग्य

स्वमग्नता : मानवी मेंदूच्या विविध अवस्थांचा व्यापक विचार आणि शाश्वत

मुंबई, दि. 2 (राधिका अघोर) : स्वमग्नता म्हणजेच ऑटीझम हा आजार नसून ती मेंदूची अवस्था आहे, हे समजणे ही ह्या अवस्थेसाठीची पहिली जनजागृती आहे. आज म्हणजेच 2 एप्रिल हा दिवस, वर्ल्ड ऑटिझम अवेरनेस डे म्हणजे, जागतिक स्वमग्नता जनजागृती दिन म्हणून पाळला जातो. यंदाच्या दिनाची संकल्पना आहे, मेंदूच्या विविध अवस्थांचा व्यापक विकार आणि शाश्वत विकास उद्दीष्टांशी […]Read More

सांस्कृतिक

दोन महिन्यात राज्याचे नवे नाट्यगृहधोरण

वर्धा दि. १- महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य असून नाटक हा कलाविष्कार येथे जोपासल्या जातो. नाट्य संस्कृतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. असे असतांना नाट्यगृह कसे असावे, कलावंतांना आणि प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याबाबतीतील सर्वंकष नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज केली. या धोरणाच्या आधारेच यापुढे […]Read More

Lifestyle

कोथिंबिरीची वडी – कुरकुरीत आणि पौष्टिक महाराष्ट्रीयन पदार्थ

मुंबई, दि. २४ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोथिंबिरीच्या वड्या हा महाराष्ट्रीयन पारंपरिक आणि कुरकुरीत पदार्थ आहे, जो नाश्त्यासाठी किंवा जेवणासोबत साईड डिश म्हणून खाल्ला जातो. ही वडी फायबर आणि लोहाने समृद्ध असल्यामुळे आरोग्यासाठीही लाभदायक असते. चला, आज आपण कोथिंबिरीच्या वड्या बनवण्याची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी पाहूया. साहित्य: कृती: १. वडीचे मिश्रण तयार करणे: २. वड्या […]Read More

राजकीय

बुलडोझर कारवाई बाबत सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले

नवी दिल्ली, दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई करण्यात येत असल्यामुळे योगी आदित्यनाथ यांचं सरकार चांगलंच चर्चेत आहे. अनेक गुन्हेगारांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं. आता एका प्रकरणातील बुलडोझर कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला चांगलंच फटकारलं आहे. प्रयागराजमधील एक वकील, एक प्राध्यापक आणि इतर […]Read More

देश विदेश

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकन

इस्लामाबाद, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. राष्ट्रीय तिजोरीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात आहेत. जानेवारी २०२५ मध्ये पाकिस्तानच्या एका न्यायालयाने इम्रान खानला १४ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर राष्ट्रीय तिजोरीला ५० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप […]Read More

अर्थ

सरकारकडून नैसर्गिक वायूच्या दरात ४ टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या मूल्य निर्धारण दरात (एपीएम) ४ टक्क्याने वाढ केली आहे. नैसर्गिक वायूपासून CNG व PNG तयार होत असल्याने त्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. एक एप्रिलपासून सरकारने नैसर्गिक वायूचे दर ६.५० वरून ६.७५ डॉलर प्रति एमएमबीटीयू वाढवले आहेत. म्हणजेच सरकारने प्रति एमएमबीटीयू दरात ०.२५ टक्क्याने वाढ केली आहे. याबाबतची […]Read More