ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला ‘डिजिटल’ उभारी

 ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला ‘डिजिटल’ उभारी

मुंबई, दि. २ : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित ‘महालक्ष्मी सरस’ या भव्य प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्ती देऊन मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने वातावरण भारावून गेले.

यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुंबईच्या महापौर रितू तावडे, ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर (भाप्रसे) तसेच मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ‘सरस महालक्ष्मी’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन. ग्रामीण महिलांच्या संघर्ष आणि यशोगाथा मांडणाऱ्या या पुस्तिकेसोबतच मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते १००० हून अधिक उत्पादनांचे डिजिटल लोकार्पण करण्यात आले.
ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस’ आणि ‘उमेद मार्ट’ हे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

ML/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *