नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकसभा निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि गुंतवणूकदारांचे ३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. याबाबत चौकशी करून सरकार आणि शेअर बाजार नियामक सेबीकडून अहवाल सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात हा अर्ज दाखल केला […]Read More
बदलापूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेला भाद्रपदातील गणेशोत्सव सोहळा परदेशांत वास्तव्याला असलेले भारतीयही मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात.परदेशातील ठिकठिकाणची महाराष्ट्र मंडळे यामध्ये उत्साहाने पुढाकार घेतात.यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती परदेशांत पाठवल्या जातात. परदेशांमध्ये सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेतली जाते. हे लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील चिंतामणी क्रिएशन्सच्या […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील सर्व जिल्ह्यात आता शेती कामांना सुरुवात झाली आहे .कोकणात गेल्या दोन दिवसापासून मान्सून शेतीला पूरक असल्याप्रमाणे पडत आहे. यामुळे कोकणातील जिल्ह्यात शेती कामांना सुरुवात झाली आहे. नांगरणी आणि पेरणी शेतकरी करत आहेत. पारंपारिक बैल जोड्यांच्या जोता बरोबरच आधुनिक पॉवर टिलरचा देखील वापर आता सध्या जिल्ह्यात होतो आहे. […]Read More
बीड, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडमध्ये समस्त मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. काल पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ शिरूर तालुका बंदची हाक देण्यात आली होती. याच दरम्यान झालेल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अनुसरून वादग्रस्त विधान केलं आणि याचाच निषेध म्हणून आज मराठा समाज आक्रमक झाला […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मालवण तळाशील येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका बुडून दोन मच्छिमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर एक मच्छिमार युवक पोहत किनाऱ्यावर आल्याने तो बचावला आहे. स्थानिक मच्छिमारानी बेपत्ता मच्छिमारांचा खाडीत आणि समुद्रात शोध सुरू ठेवला आहे. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET(UG) 2024 परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 5 मे 2024 रोजी 571 शहरांमधील 4750 केंद्रांवर (परदेशातील 14 शहरांसह) घेण्यात आली. याचा निकाल ४ जून ला जाहीर करण्यात आला या परीक्षेदरम्यान काही केंद्रांवरील विद्यार्थ्यांना नियोजित असलेला पूर्ण ३ तास २० मि.चा वेळ देण्यात आला नाही अशा तक्रार […]Read More
हैदराबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वांत मोठ्या रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव (87) यांचे आज सकाळी हैदराबादच्या रुग्णालयात निधन झाले. रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 5 जून रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हैदराबादमध्ये त्यांनी शेकडो एकरांमध्ये उभारलेली रामोजी फिल्म सिटीही दक्षिण […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI च्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आता मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे. RBI ने काही दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली आहे.RBI ने ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने आपल्या देशातील राखीव ठेवींमध्ये हस्तांतरित केले आहे. त्यानंतर आता देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाच्या परकीय […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळा तोंडावर आल्यामुळे रेल्वे प्रशासन रेल्वे रुळ तसेच सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती आणि देखभालीसाठी युद्धपातळीवर काम करत आहे. मागील आठवड्यात यासाठी तब्बल ३ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. आता उद्याच्या रवीवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर तर […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सुमारे ३९ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया १० जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा संबंधित जिल्हाधिकारी यांनी अधिग्रहीत केल्या होत्या. तसेच सहकार विभागातील तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे निवडणुकीला पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका […]Read More