mmcnews mmcnews

राजकीय

निवडणूक आयोगाच्या निवेदनाची सर्वोच्चन्यायालयाकडून दखल

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर बूथनिहाय मतदानाच्या टक्केवारीचा डेटा अपलोड करण्याच्या मागणीवर विचार करण्यास तयार असल्याच्या आयोगाच्या निवेदनाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना १० दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे त्यांचे निवेदन सादर करण्यास सांगितले. मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर २०१९ […]Read More

राजकीय

उपसभापतींच्या विश्वासदर्शक ठरावानंतर विधानपरिषदेत गदारोळ

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर सभागृहाचा विश्वास दाखवणारा प्रस्ताव आज सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला, भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला. विरोधकांनी या विश्वासदर्शक प्रस्तावाला विरोध करत त्यावर आक्षेप घेतला त्यावर मोठा गदारोळ झाला, सभापती आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने विरोधक संतप्त झाले , घोषणाबाजी झाली , […]Read More

महानगर

लक्षवेधी सूचना उपस्थित करणारे सदस्य गैरहजर , मंत्री संतापले

मुंबई दि १९—आज सकाळी विधानसभेच्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना चर्चेसाठी होत्या मात्र ती उपस्थित करणारे सदस्यच गैरहजर असल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत या सूचना आता रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली. त्यांनी याबद्दल जोरदार आक्षेप घेत चांगलाच संताप व्यक्त केला, अध्यक्षांनी तातडीने त्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. गेले चार […]Read More

राजकीय

एमपीएससी मधील रिक्त पदे भरणे अंतिम टप्प्यात

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती अंतिम टप्प्यात असून लवकरच ही तीन पदं भरली जातील अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानपरिषदेत दिली. एमपीएससीतील तीन रिक्त पदांवरील सदस्यांच्या निवडीसाठी मुलाखती देखील पूर्ण झाल्या असून लवकरच मुख्यमंत्री याला मान्यता देतील असं त्यांनी सांगितलं. राज्यातील […]Read More

देश विदेश

अखेर सुनीता विल्यम्स आपल्या सहकाऱ्यांसह पृथ्वीवर सुखरूप…

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळातील आयएसएस अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स आज पृथ्वीवर परतली. तिच्यासोबत तिचा सहकारी बुच विलमोर आणि इतर दोन अंतराळवीर यांना घेऊन येणाऱ्या स्पेसएक्स कंपनीच्या कॅप्सूलने अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनारपट्टीजवळ समुद्रात स्प्लॅश डाऊन म्हणजे पॅराशूटच्या सहाय्याने पाण्यात सावकाश उतरण्याची प्रक्रिया […]Read More

ट्रेण्डिंग

हे आहेत सर्वांधिक कर भरणारे बॉलिवूड कलाकार

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवुडचे बीग बी अमिताभ बच्चन आज ८२ व्या वर्षीही स्टार अभिनेत्यांना भारी ठरत आहेत. पिंकव्हिलाच्या एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल १२० कोटी रुपये कर भरला आहे. वर्षभरातील त्यांची एकूण कमाई ३५० कोटी रुपये होती. त्यांनी चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट […]Read More

राजकीय

आधारकार्डसोबत लिंक होणार मतदान ओळखपत्र

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील निवडणूका पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. निवडणूक आयोगाने आता प्रत्येक मतदारांचे मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासाठी सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि घटनेमधील तरतुदींचा दाखला देत हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता प्रत्येक व्यक्तीला आपलं मतदान […]Read More

विज्ञान

पंतप्रधान मोदींनी पाठवले अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पत्र

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडून पृथ्वीकडे रवाना झाल्या आहेत. उद्या त्यांचे यान समुद्रात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहिले आहे. सुनीता विल्यम्स ५ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) […]Read More

ट्रेण्डिंग

पर्यटन बचाव समितीकडून आजपासून माथेरान बेमुदत बंद

माथेरान, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांचे हक्काचे पर्यटनस्थळ रायगड जिल्ह्यातील माथेरान पर्यटकांच्या होणाऱ्या लुबाडणूकीमुळे आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय माथेरान पर्यटन बचाव समितीने घेतला आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत पर्यटन बचाव समितीने बंद पुकारला आहे. पर्यटकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात संपूर्ण माथेरान बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माथेरानच्या […]Read More

महिला

सरकारी जाहिरातींमध्ये विनासंमती महिलेचा फोटो छापल्याने न्यायालयाकडून नोटीस

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलेच्या संमतीशिवाय सरकारी जाहिरातांमध्ये तिच्या छायाचित्राचा अनधिकृत वापर करणारे सरकारी यंत्रणेला चांगलेच भोवणार आहे. याबाबत केंद्र आणि चार राज्य सरकारांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तक्रारदार नम्रता अंकुश कावळे या महिलेने अर्जात म्हटले की, तिचे छायाचित्र एका छायाचित्रकाराने घेतले होते. ते ‘Shutterstock.com’ या वेबसाइटवर तिच्या संमतीशिवाय अपलोड […]Read More