अमेझॉनचे AI ऑडिओ फीचर लॉन्च

 अमेझॉनचे AI ऑडिओ फीचर लॉन्च

मुंबई, दि. 2 : लोकप्रिय इ कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे, ज्यामध्ये युझर प्रोडक्टबद्दल प्रश्न विचारून संवाद साधू शकतात. कंपनीने आपल्या ‘Hear the Highlights’ फीचरमध्ये ‘Join the Chat’ हा नवीन पर्याय जोडला आहे. याच्या मदतीने युझर एखाद्या प्रोडक्टची ऑडिओ समरी ऐकताना टेक्स्ट किंवा आवाजात प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ, युझर विचारू शकतो की, ही कॉफी मशीन मुलांसाठी योग्य आहे का? एआय प्रोडक्टची माहिती, ग्राहकांचे रिव्ह्यू आणि उपलब्ध माहितीवरून उत्तर देतो.

अमेझॉनमध्ये आधीपासूनच ‘Rufus’ नावाचा असिस्टंट आहे. त्याचा एआय-पॉवर्ड शॉपिंग असिस्टंट खरेदीला अधिक संवादात्मक बनवतो. तो प्रोडक्ट कॅटलॉग, रिव्ह्यू आणि वेब डेटाच्या आधारावर वापरकर्त्यांना सल्ला देतो. वापरकर्ते याचाही वापर करू शकतात.

हे फीचर कसे काम करते

  • हे फक्त सामान्य चॅटबॉट नाही.
  • तपशील, रिव्ह्यू, वेबवर उपलब्ध माहिती… या सर्वांना एकत्र करून उत्तर देतो.
  • जर एखाद्या फीचरबद्दल आधीच सांगितले गेले असेल, तर एआय नवीन आणि वेगळे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

हे फीचर कुठे मिळेल?

  • अमेरिकेत उपलब्ध आहे. इतर देशांमध्येही येईल.
  • iOS आणि Android दोन्हीवर वापरता येईल.
  • वापरकर्त्याला फक्त प्रोडक्ट पेजवर जाऊन ‘Hear the Highlights’ बटण दाबावे लागेल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *