XChat : एलॉन मस्कनी आणले WhatsApp ला टक्कर देणारे App
मुंबई, दि. २७ :
एलॉन मस्क याची कंपनी X ने एक नवीन App बाजारात दाखल केले आहे. स्टँडअलोन मॅसेजिंग ॲप XChat लाँच केले आहे. सध्या हे App iOS युझर्ससाठी आणण्यात आले आहे. या ॲप वर युझर्स त्यांच्या X कॉन्टॅक्ट्स सोबत चॅट करू शकतात. कॉलिंग करू शकतात. फाईल शेअर करू शकतात. सध्या XChat केवळ iOS युझर्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच हे ॲप इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.
XChat मध्ये युझर्सला ऑडियो आणि व्हिडिओ कॉलिंग, टेक्स्ट मॅसेजिंग, ग्रुप चॅट आणि फाईल शेअर करता येईल. याशिवाय तसेच दोघांमधील संवाद तिसऱ्याच्या हाती लागू नये यासाठी डिसॲपरिंग मॅसेज, मॅसेज एडिट आणि डिलिट असे पर्याय देण्यात आले आहे. स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचे फीचर देण्यात आले आहे. हे ॲप एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि पिन सिक्युरिटीसह येते. हे फीचर पाहता XChat थेट WhatsApp आणि Facebook Messenger ला टक्कर देणार आहे.
SL/ML/SL