59 ग्रामीण विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे घडवणार इस्रोची सफर

 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे घडवणार इस्रोची सफर

ठाणे, दि. २७ : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी ‘मिशन भरारी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे ‘ग्रामीण ते अवकाश’ हा व्हिजन आज आमलात आले. 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना शिंदे थेट इस्रोची सफर घडवून आणत आहेत. . या शैक्षणिक सहलीला आज सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सहल कार्यक्रमानुसार आज मुंबईहून तिरुवनंतपुरम येथे प्रवास होईल. 28 एप्रिल रोजी विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि सनसेट व्ह्यू पॉईंटला भेट दिली जाईल. 29 एप्रिल रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन (TERLS) आणि प्रियदर्शिनी तारांगण येथे भेट दिली जाईल. 30 एप्रिल रोजी नैसर्गिक इतिहास संग्रहालये, तर 1 मे रोजी नेपियर संग्रहालय येथे भेट देऊन परतीचा प्रवास केला जाईल.

‘मिशन भरारी’ उपक्रमाचे उद्घाटन 26 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. इयत्ता 5 वी ते 8 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 9316 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातून 2007 विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड झाली आणि अंतिम टप्प्यात 478 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर परीक्षा घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेतून प्रत्येक तालुक्यातील सरासरी 10 विद्यार्थ्यांची निवड करून एकूण 59 विद्यार्थ्यांना या विशेष सहलीसाठी पात्र ठरवण्यात आले असून, यामध्ये 54 मराठी माध्यम आणि 5 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ही सहल केवळ पर्यटन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे शिंदे म्हणाले. विद्यार्थ्यांना संशोधन, अवकाश विज्ञान, प्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *