ठाण्यात नालेसफाईसाठी रोबोटिक पद्धतींचा वापर

 ठाण्यात नालेसफाईसाठी रोबोटिक पद्धतींचा वापर

ठाणे, दि. २७ : ठाणे मनपाने आता पावसाळापूर्व नालेसफाई मोहीम सुरू केली असून, कामाची सुरुवात मुंब्रा परिसरातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर रोबोटिक आणि यांत्रिक पद्धतींचा वापर करून नालेसफाई केली जात आहे. नाल्यांमधून काढण्यात येणारा गाळ शास्त्रोक्त पद्धतीने हाताळून योग्य ठिकाणी स्थलांतरित केला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मोठ्या नाल्यांसाठी यांत्रिक व रोबोटिक साधनांचा वापर केला जात असताना, अरुंद व दुर्गम ठिकाणी मनुष्यबळाच्या मदतीने सफाई सुरू आहे.

दरवर्षी नाले वेळेत साफ न झाल्याने पाणी तुंबणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि अपघात घडण्याच्या घटना समोर येतात. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा व्यापक नियोजन करण्यात आले आहे. सन २०२५-२६ साठी पालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समित्यांअंतर्गत मुख्य व उपनाल्यांसह एकूण ३८४.९१ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून १० एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली आहे. शहरातील सुमारे १८६ किलोमीटर नाल्यांच्या सफाईवर विशेष भर देण्यात आला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *