महिला आरक्षण हे तर षडयंत्र – विरोधकांचा आरोप
नवी दिल्ली, दि. १६ : आज संसदेत महिला आरक्षण विधेयकावर झालेल्या चर्चेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी सरकारच्या हेतूवर तीव्र प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शवला, मात्र त्याच्या वेळ आणि उद्देशाबाबत शंका व्यक्त केली. त्यांच्या भाषणात ‘चाणक्य जिवंत असते तर…’ या उल्लेखाने सभागृहात हलकासा गदारोळ झाला. नारीशक्ती वंदन विधेयकाचे श्रेय मला नको आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. परंतु जे पुरुष वारंवार महिलांना संभ्रमित करतात, अशांना महिला लगोलग ओळखतात. त्यामुळे सरकारने सावधानतेने पावले टाकावीत, नाहीतर पकडले जाण्याची शक्यता आहे. महिला आरक्षण विधेयकात राजकारण स्पष्ट दिसतंय. सत्ताधाऱ्यांकडून सत्ता टिकवण्यासाठी हा सगळा आटापिटा सुरू आहे. जर चाणाक्य जिवंत असते तर त्यांनाही सत्ताधाऱ्यांचे राजकीय चातुर्य आणि चालाखी पाहून आश्चर्य वाटले असते, अशी टोलेबाजी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केली. प्रियांका गांधींच्या टोलेबाजीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हसू अनावर झाले. त्यावर माझे म्हणणे अमित शाह यांना पटले आहे, असा चिमटाही प्रियांका गांधी यांनी काढला.
केंद्र सरकारने ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मतदारसंघ फेररचनेशी महिला आरक्षण जोडणाऱ्या घटनादुरुस्तीला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. प्रियांका गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दर्शवला परंतु मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडले.
दरम्यान महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला डी लिमिटेशन आणायचं आहे. महिलांचा वापर करून भाजपा काहीतरी वेगळंच करत आहे,असा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केले जात आहे,हे केवळ षडयंत्र असून ते लवकर समोर येईल,2023 मध्येच महिला आरक्षण लागू होणार होतं, मात्र भाजपाने त्यामध्ये नियम व अटी आणल्या. महिला आरक्षण करायचं असेल तर विना पुनर्रचना ते आजही केलें जाऊ शकते. काँग्रेसने देशाला पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांना दिले, पण भाजपा केवळ महिलांचा वापर करते, असा आरोप खासदार प्रणित शिंदे यांनी केला आहे. त्या सांगलीमध्ये बोलत होत्या.
SL/ML.SL