कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली

 कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली

मुंबई, दि १६
कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी आज (दिनांक १६ एप्रिल २०२६) बृहन्मुंबई मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात झालेल्या या भेटीदरम्यान महापौर श्रीमती रितू तावडे यांनी श्रीमती निकम यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून त्यांना सन्मानित केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे याप्रसंगी उपस्थित होते. श्रीमती तावडे आणि श्रीमती निकम यांच्यात विविध नागरी विषयांवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा झाली.

श्रीमती रूपाराणी निकम यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ऐतिहासिक वास्तूचा वारसा (हेरिटेज वॉक) अनुभव घेतला. त्यांनी महानगरपालिका सभागृहासह मुख्यालयातील विविध विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. विशेषतः आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिलेल्या भेटीत त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेची यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत राहते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रणालीचे कौतुक व्यक्त केले. आपत्कालीन व्यवस्थापन विभाग प्रमुख श्रीमती रश्मी लोखंडे यांनी श्रीमती निकम यांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाबद्दल माहिती दिली.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *