RBI ने रद्द केला Paytm Payments Bank चा परवाना
मुंबई, दि. 25 : RBI एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड’चा (PPBL) बँकिंग परवाना रद्द करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, हा निर्णय २४ एप्रिल २०२६ पासून अमलात आला असून, बँकेच्या सर्व बँकिंग कामकाजावर तात्काळ प्रभावाने बंदी घालण्यात आली आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ मधील विविध कलमे आणि तरतुदींचे सातत्याने उल्लंघन केल्याचा ठपका पेटीएम पेमेंट्स बँकेवर ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, बँकेने नियामक नियमांचे पालन करण्यात वारंवार कसूर केली होती. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि बँकिंग प्रणालीतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी यापेक्षा कठोर कारवाई करणे अनिवार्य असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. या निर्णयामुळे आता पेटीएम पेमेंट्स बँकेला कोणत्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारणे, आर्थिक व्यवहार करणे किंवा बँकिंग सेवा प्रदान करणे कायदेशीररित्या अशक्य होणार आहे.
परवाना रद्द झाल्यामुळे बँकेच्या दैनंदिन कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता ही बँक नवीन ग्राहक जोडू शकणार नाही किंवा जुन्या ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम स्वीकारू शकणार नाही. या कारवाईमुळे पेटीएम पेमेंट्स बँकेचे अस्तित्व धोक्यात आले असून, संबंधित बँकेला आता आपला बँकिंग व्यवसाय पूर्णपणे गुंडाळावा लागणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या धडक कारवाईमुळे पेटीएम ॲपचा वापर करणाऱ्या कोट्यवधी युजर्समध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

SL/ML/SL