लोकलमध्ये फेरीवाल्यांच्या अधिकृत प्रवेशाला प्रवाशांकडून तीव्र विरोध

 लोकलमध्ये फेरीवाल्यांच्या अधिकृत प्रवेशाला प्रवाशांकडून तीव्र विरोध

मुंबई, दि. 25 : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे नेटवर्कवर प्रचंड गर्दीत लोकलमध्ये येणाऱ्या फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि गर्दीची समस्या अधिक गंभीर होईल, असा इशारा देत पश्चिम रेल्वे प्रवासी संघटनांनी परवानाधारक फेरीवाल्यांना परवानगी देण्यास प्रखर विरोध केला आहे. मध्य रेल्वेने आधीच उपनगरीय गाड्यांमध्ये परवानाधारक फेरीवाल्यांना परवानगी दिली आहे.

मध्य रेल्वे’ने २२ डिसेंबर २०२५ ते २१ डिसेंबर २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण दरम्यान परवानाधारक फेरीवाल्यांना परवानगी देण्याचे कंत्राट आधीच दिले आहे. २३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या लिलावात या कंत्राटाचे मूल्य १.३२ कोटी रुपयांहून अधिक निश्चित करण्यात आले असून, वार्षिक परवाना शुल्क ४४.०१ लाख रुपये असेल. यामध्ये प्रति व्यक्ती दररोज १२० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे फेरीवाले सर्व वर्गाच्या डब्यांमध्ये खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची विक्री करू शकणार आहेत.

रेल्वेच्या या निर्णयावर प्रवासी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया उमटवल्या आहेत. प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधी वंदना सोनावणे यांनी सांगितले की, रेल्वेने उत्पन्नापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *