राज्य परीक्षा मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी…

 राज्य परीक्षा मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी…

पुणे दि ८ : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यात विद्यार्थिनींनी बाजी मारली तर कोकण विभाग अव्वल ठरला आहे.

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४२,४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी १४,२०,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ आहे.

२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २९,५०६ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८,८२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी २२,००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.३३ आहे.

३. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २९,५१८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी २८,८६७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी ९७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३३.७९ आहे.

४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खाजगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण १६,१४,०५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी १६,००,१६४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी १४,५२,२४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.७५ आहे.

५. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण १०,०३१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,९१२ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी ९,०४२ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२२ आहे.

६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.६२%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१%) आहे.

७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.४० ने जास्त आहे.

८. माध्यमिक शालान्त (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ करीता एकूण ६४ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण २० विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *