धि गोवा हिंदु असोसिएशन तर्फे गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू
मुंबई दि ८ : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गरजू व होतकरू गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’ने दरवर्षी प्रमाणे यंदाही मदतीचा हात पुढे केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी संस्थेतर्फे साधारण आणि विशेष शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव जितेश सावंत यांनी केली आहे.
कोणत्या अभ्यासक्रमांसाठी आहे ही शिष्यवृत्ती?
संस्थेतर्फे दोन गटांत शिष्यवृत्ती विभागली गेली आहे:
१. साधारण शिष्यवृत्ती: इयत्ता १० वी नंतरचे उच्च माध्यमिक शिक्षण, बी.ए., बी.कॉम., बी.एससी., डिप्लोमा आणि सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
२. विशेष शिष्यवृत्ती: अभियांत्रिकी (Engineering), फार्मसी, वास्तुशास्त्र (Architecture), कृषी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यक (Medical), दंतवैद्यक, सनदी लेखापाल (CA) आणि भारतीय तत्त्वज्ञान या पदवी अभ्यासक्रमांसाठी.
पात्रता आणि अटी:
अर्जदार विद्यार्थ्यांनी खालील निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे:
गुणवत्ता: विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेत किमान ६५% गुण प्राप्त केलेले असावेत.
उत्पन्न मर्यादा:
साधारण शिष्यवृत्तीसाठी: वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी.
विशेष शिष्यवृत्तीसाठी: वार्षिक उत्पन्न ₹४ लाखांपेक्षा कमी.
कागदपत्रे: शासकीय किंवा उपशासकीय अधिकाऱ्यांचा सही-शिक्क्यासह उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
महत्त्वाची टीप: ज्या विद्यार्थ्यांचे स्वतःच्या नावाने बँक खाते नाही, त्यांनी ते त्वरित उघडावे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
अर्ज कसा करावा?
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह संस्थेच्या मुंबईतील कार्यालयात संपर्क साधावा:
पत्ता: धि गोवा हिंदु असोसिएशन, ३५८, गोमंतधाम, डॉ. डी. बी. मार्ग (भडकमकर मार्ग), मुंबई – ४०० ००७.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ: https://goahinduasso.org/
संपर्क: श्रीमती पल्लवी राऊत – ९०८२१८३८०६
संस्थेचे आवाहन:
अटींची पूर्तता न झाल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच, या संदर्भात कोणताही वैयक्तिक पत्रव्यवहार किंवा दूरध्वनी केला जाणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.ML/ML/MS