मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांची व्यवहार्यता तपासून अंमलात आणा आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचे निर्देश

 मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांची व्यवहार्यता तपासून अंमलात आणा आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचे निर्देश

मुंबई, दि २९

मुंबई महानगर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी दैनंदिन कचरा संकलन, वर्गीकरण आणि वहन व्यवस्था ही त्रिसुत्री अधिक बळकट करण्यास प्राधान्य देण्यात यावे. स्वच्छतेत नवनवे प्रयोग करण्यासाठी नागरिक संघ, सेवाभावी संस्था, गृहनिर्माण संस्थांचे मार्गदर्शन घ्या. तसेच टीआयएसएस (Tata Institute of Social Sciences) सारख्या संस्थांचे मार्गदर्शन घ्या. त्यांचे अभ्यासगट करून मुंबई महानगर अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी मुंबई शहर विभागातील वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी येथील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता चौक्यांना आज (दिनांक २९ एप्रिल २०२६) पहाटे आकस्मिक भेट देवून पाहणी केली. तसेच वडाळा परिसरातील सुका कचरा संकलन केंद्र आणि बरकत अली दर्गा मार्ग, अरुणकुमार वैद्य मार्ग (वडाळा पूर्व) येथे दुतर्फा सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी असलेली बेवारस वाहने व अस्वच्छतेबाबत स्वतंत्र मोहीम हाती घेऊन येत्या काही दिवसात हा मार्ग स्वच्छ करण्याचे निर्देश श्रीमती भिडे यांनी यावेळी दिले.

वडाळा, चेंबूर आणि चुनाभट्टी परिसरात पाहणी करताना महानगरपालिका आयुक्त श्रीमती भिडे यांनी घनकचराबाबतच्या विविध विषयांचा आढावा घेतला. पाहणी दरम्यान त्यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. दररोज स्वच्छता वाहनांच्या किती फेऱ्या होतात, कचऱ्याचे वर्गीकरण-वहन कोणत्या पद्धतीने केले जाते, कोणत्या भागांत अधिक कचरा निर्माण होतो, अशा विषयांची सविस्तर माहिती जाणून घेतली. घराघरांतून संकलित होणारा कचरा आणि त्याच्या वाहतुकीचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश यावेळी श्रीमती भिडे यांनी दिले. विविध संकुलांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे स्वतंत्र नियोजन करणे, कचरा वर्गीकरणाबाबत विशेषतः दाटवस्ती भागात व्यापक जनजागृती करणे, तसेच ‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्वच्छता अभियान अधिक परिणामकारकपणे राबविण्यावर भर देण्याच्या सूचना श्रीमती भिडे यांनी केल्या.

घनकचरा व्यवस्थापन नागरी सहभागातून अधिक प्रभावी होऊ शकते. कचरा संकलन, वर्गीकरण आणि वहन व्यवस्थेसाठी नव्या संकल्पनांना वाव द्या. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी सातत्याने संवाद साधा. त्यांना या अभियानाचा सक्रिय भाग बनवा.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *