राजे शिवाजी या चित्रपटाच्या नावात छत्रपती शब्द समाविष्ट करावा, सी एस चव्हाण यांची मागणी.
मुंबई, दि २९
राजे शिवाजी चित्रपटाच्या नावात छत्रपती हा शब्द समाविष्ट करावा यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन चे अध्यक्ष सी. एस. चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दे मांडले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनने 1 में 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या राजा शिवाजी” या आगामी बॉलिवूड चित्रपटाच्या शीर्षकाबाबत गंभीर आक्षेप नोंदवला आहे. या चित्रपटाचे निर्मिती रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आहेत.
फाउंडेशनच्या मते, चित्रपटाच्या नावातून ‘छत्रपती हा मानाचा किताब वगळणे अजिबात योग्य नाही. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा, प्रतिष्ठेचा व वारशाचा अवमान होतो.
फाउंडेशनचे अध्यक्ष सी. एस. चव्हाण व इतर सदस्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तात्काळ नावात दुरुस्ती करण्याची अधिकृत मागणी केली आहे.तसेच
चित्रपटाच्या नावात ‘छत्रपती’ हा शब्द अनिवार्यपणे समाविष्ट करण्यात यावा चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सन्मानपूर्वक व ऐतिहासिकदृष्ट्या अचूक चित्रण करण्यात यावे. जर चित्रपट निर्मिती व संबंधित प्राधिकरणांनी तातडीने योग्य ती कार्यवाही केली नाही, तर कायदेशीर पावले उचलली जातील.
तसेच
चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती मिळवण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक असल्यास देशभरात आंदोलन व निषेध करण्यात येईल, असा इशारा श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष सी एस चव्हाण यांनी दिला आहे.KK/ML/MS