mmcnews mmcnews

राजकीय

रायगडावरील कथित वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याची मागणी

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील महापुरुषांच्या स्मारक स्थळाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ऐतिहासिक घटना, स्थानांना कपोलकल्पित कथा जोडल्या जातात. दुर्गराज राजगडावरील शिवरायाच्या समाधी शेजारी असलेली कथिक वाघ्या कुत्र्याची समाधी ही अशीच एक जोडलेली कथा. या बाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत. ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरुन हटवण्यात यावी अशी […]Read More

देश विदेश

भारतीय विदुषी गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना हॉलबर्ग पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय विदुषी आणि लेखिका गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना २०२५ चा हॉलबर्ग पुरस्कार जाहीर झाला आहे. तुलनात्मक साहित्य, अनुवाद, वसाहतोत्तर अभ्यास, राजकीय तत्वज्ञान आणि स्त्रीवादी सिद्धांतातील त्यांच्या संशोधन आणि योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. गायत्री चक्रवर्ती स्पिवाक या एक प्रसिद्ध भारतीय विद्वान, साहित्यिक सिद्धांतकार आणि स्त्रीवादी विचारवंत आहेत. […]Read More

ट्रेण्डिंग

प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांनी ताब्यात

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून आज दुपारी ताब्यात घेतले असून पोलिस कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. प्रशांत कोरटकरला उद्या कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडीत यांनी दिली. प्रशांत […]Read More

देश विदेश

स्वदेशी आर्टिलरी गन खरेदीला सरकारची मंजुरी

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने अॅडव्हान्स्ड टोअड आर्टिलरी गन सिस्टिम (ATAGS) खरेदीला मंजुरी दिली आहे. ATAGS स्वदेशी असल्याने भारताच्या संरक्षण क्षेत्राला मोठे बळ मिळणार आहे. तसेच, शस्त्रास्त्रांसाठी भारताचे इतर देशांवरील अवलंबित्वही कमी होईल. सात हजार कोटी रुपये खर्चून या आर्टिलरी गन प्रणालीची खरेदी केली […]Read More

राजकीय

खासदारांच्या मानधनात २४% वाढ

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने खासदारांच्या मानधनात २४% वाढ केली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने आज याबाबतची अधिसूचना जारी केली. यानुसार, सध्याच्या खासदारांना आता दरमहा १.२४ लाख रुपये वेतन मिळेल. पूर्वी त्यांना दरमहा १ लाख रुपये मिळत होते. ही वाढ खर्च महागाई निर्देशांकाच्या आधारे करण्यात आली आहे. वाढीव पगार १ एप्रिल […]Read More

ट्रेण्डिंग

आमिर खान, किरण रावने घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट

बालेवाडी येथे रविवारी २३ मार्चला पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आमिर खान आणि किरण राव यांनी भेट घेतली. यावेळी दोघांनीही देशमुख कुटुंबियांना हिंमत ठेवण्याचा सल्ला दिला. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, त्यांचा मुलगा, संतोष देशमुख यांचा मुलगा यावेळी उपस्थित होते. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.Read More

राजकीय

महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव

महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार केंद्राने द्यावा, अशी शिफारस करणारा ठराव मांडला गेला. हा ठराव २४ मार्चला म्हणजेच सोमवारी महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि […]Read More

सांस्कृतिक

एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत लोकसंस्कृतीचा राजधानीत जागर

नवी दिल्ली, २३ : महाराष्ट्रातील ‘ढोल बोहाडा’ नृत्य आणि ओडिसातील बाजसाल या लोकनृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. नवीन महाराष्ट्र सदन, येथे एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमांतर्गत “लोकसंस्कृतीचा लोकोत्सव” या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्त […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शिवाजीनगरमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई

मुंबई, दि.२३ (एम एमसी न्यूज नेटवर्क): शिवाजीनगर परिसरात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरवर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत त्याला रंगेहाथ अटक केली. डॉ. दिलीप कृष्णपाल सिंह (वय ४९)असे या बोगस डॉक्टरचे नाव असून तो शिवाजीनगर गोवंडी येथील रहिवासी आहे. गुन्हे शाखेच्या म.पो.उ.नि. माशेरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कक्ष-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत […]Read More

राजकीय

राज्य सरकार करणार स्वतःहून वारस तपास, सातबारे अद्ययावत

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात जमिनींचे सातबारा उताऱ्यावर अनेक वर्षे मयताची नावेच राहून त्याचा वारस तपास न करता तो सातबारा तसाच पडून राहतो, त्यामुळे अशा सर्व मालमत्तांचा वारस तपास शासन स्वतःहून करून पुढील दीड महिन्यात संबंधित अर्जदाराच्या अर्जाची वाट न पाहता त्या संबंधित सातबाऱ्यावर वारसांची नावे दाखल करण्याची मोहीम राबविण्यात येईल अशी […]Read More