उत्तर प्रदेश, दि. २३ : सर्वजातीय नायक विशाल सामूहिक कन्या विवाह महायज्ञ आज संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वरूपात पार पडला. जैतपूर (औरैया) येथील हनुमान धाम, साहब नगर, उत्तर प्रदेश येथे जन संघर्ष मंचच्या मार्गदर्शनाखाली सहावा सर्वजातीय नायक विशाल सामूहिक कन्या विवाह महायज्ञ आज 23 मे 2025 रोजी भव्य व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. […]Read More
नाशिक, दि. 23:– नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे. गर्दीचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना या बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालय येथील सभागृहात उपसभापती […]Read More
कोल्हापूर दि २३– कोल्हापूर कागल रस्त्यावर कोगनोळी टोल नाक्यावर एका कंटेनरच्या डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने टोल नाक्यावरील दोन बूथ जळून खाक झाले, यात जीवितहानी मात्र झाली नाही. कंटेनर चालकाने वेळीच उडी मारून बचाव करुन घेतला. टोलनाक्याच्या लेन मधून बेळगावहून मुंबईकडे जाणारामालवाहू कंटेनर टोलवर आला. यावेळी डिझेल टाकीचा स्फोट होऊन आग कंटेनरच्या पुढील बाजूस भडकली. आगीने […]Read More
मुंबई दि २३– राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला असून, त्यानुसार शेतरस्त्यांची किमान रुंदी आता ३ मीटर अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, या रस्त्यांची नोंदणी ७/१२ उताऱ्यावर ‘इतर हक्क’ म्हणून करावी लागणार असून, संबंधित प्रकरणांचा निर्णय ९० दिवसांच्या आत देणे […]Read More
लातूर दि २३– मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील रेणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधाऱ्यांवरील पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्या वर गेली असून, सध्या बंधाऱ्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, त्यामुळे रेणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, […]Read More
मुंबई,दि.२३– राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हितलक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि महाविद्यालयांना संधी देण्यासाठी, महाविद्यालयांना नॅक (NAAC) मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी ६ महिन्यांची शिथिलता (मुदतवाढ) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील अकृषि विद्यापीठे व संलग्नित सर्व पात्र महाविद्यालयांना नॅक मुल्यांकन व […]Read More
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह सहा जणांविरुद्ध जम्मू-काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आरोपपत्र दाखल केले आहे . हे प्रकरण सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टमधील अनियमिततेशी संबंधित आहे. दरम्यान सत्यपाल मलिक यांनी १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सांगितले होते की, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना ३०० कोटी […]Read More
जळगाव दि २२– आदिशक्ती मुक्ताबाई ७२८ वा अंतर्धान समाधी सोहळा निमित्त संत मुक्ताबाई मंदिर येथे आज महापुजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले असून हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक आज मुक्ताईनगर येथे दाखल झाले आहे. वारकरी संप्रदायात मोठी परंपरा या सोहळ्याची आहे. या निमित आदिशक्ती मुक्ताई च्या मंदिरात कीर्तन भजन यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]Read More
मुंबई दि. २२ :- राज्यातील तूर उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार […]Read More
मुंबई प्रतिनिधीआर्थर रोड नाका येथील बीएमसी कर्मचारी निवासस्थान परिसरात असलेल्या शंभर वर्षे जुन्या श्री.लक्ष्मीनारायण मंदिर समितीला बीएमसी व बिल्डरमार्फत नोटीस देण्यात आली होती. या नोटिसीमुळे स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते. मंदिर तोडण्यासाठी पुढे सरसावलेल्या महापालिका आणि बिल्डरची दादागिरी आम्ही सहन करणार नाही. मंदिराची जागा वाचवण्यासाठी आम्ही समितीच्या सदैव सोबत आहोत! या विषयाच्या संदर्भात […]Read More